Tuesday 14 August 2012

वाघ्या आणि खंड्याचे भाग्य का उजळणार?




सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा उत्सव पुरवणीतील "वाघ्या आणि खंड्याचे भाग्य कधी उजळणार" हा मराठा द्वेषाने भरलेला लेख वाचला आणि त्याला प्रतिक्रिया देणारा लेख लिहावा वाटला म्हणून हा लेख प्रपंच.लेखाची सुरुवात संजय राऊत निर्जीव पुतळयाच राजकारण केल जातंय आणि हे निषेधार्ह आहे अस म्हणून करतात पण स्वताच वाघ्याला न्याय कधी मिळणार म्हणून निर्जीव पुतळ्याचे राजकारण करतात हे जाणीवपूर्वक विसरतात.मुळात संजय राऊत या नसलेल्या पत्रकाराच दुखन हे आहे कि उत्तर प्रदेशात मायावतींचा पुतळा तोडल्यामुळे उत्तर प्रदेश च्या लोकांनी गोंधळ घातला तसा गोंधळ ह्या वाघ्याचा पुतळा तोडल्यावर का झाला नाही हे आहे.संजय राऊत लेखात असे म्हणतात कि देशात जिवंत माणसाना जाळले जात आहे बेघर केल जात आहे आणि राजकारण्यांना निर्जीव पुतळ्याचा राग आणि लोभ येतोय आता राग हा शब्द संभाजी ब्रिगेड साठी आहे कारण त्यांनी वाघ्याच्या रागापोटी तो पुतळा उध्वस्त केला आणि लोभ हा बाबासाहेब आणि मायावती यांचे पुतळे हटविल्यानंतर बसप नि जो निषेध केला यासाठी राऊत नि वापरला आहे.म्हणजे बसप ने बाबासाहेबांचा पुतळा हटविल्यानंतर जो गोंधळ केला तो संजय राऊत यांना अमान्य आहे त्याचा ते त्यांच्या कायस्थ साहेबांसारखा मार्मिक भाषेत निषेध हि करतात आणि दुसरीकडे वाघ्याचा पुतळा तोडल्यानंतर महाराष्ट्रात दंगा का झाला नाही याची खंत हि व्यक्त करून गांडूळा सारखा दुट्टपीपणा करतात.
दुसरी गोष्ट म्हणजे निर्जीव पुतळयाच राजकारण करू नका असा सल्ला शिवसेनेचे संजय राऊत देतात ज्यांच्या पक्षाने मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची कुणी तरी विटंबना केल्यामुळे खूप मोठी दंगल घडवून आणली होती आणि ज्यांनी बाबरी मस्जिद उध्वस्त करण्यात मोठा हातभार लावला होता.आसामातील हिंसाचारात १०० हून जास्त लोक मारले गेले त्याकडे दुर्लक्ष करून बसप चे खासदार बाबासाहेबांच्या अप्मानाकडे लक्ष देतात ह्याच संजय राऊत यांना फार दुखः होत मग दादू कोंडदेवचा पुतळा हटविल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेने अयशस्वी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही काय कोमात गेला होता का राऊत साहेब?तेव्हा तुम्हाला का दुख झाले नाही?दुसरा मुद्दा ते मांडतात कि काल परवा झालेल्या बोंब स्फोटातील आरोपी कोण हे समजत नाही मग साडे तीनशे वर्षापूर्वीचे दादू चे दाखले खरे कि खोटे हे कसे कळणार?मग राऊत साहेब साडे तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल जर तुम्ही संशय व्यक्त करता तर मग अडीच हजार वर्षापूर्वीच्या रामाचा दाखला देऊन बाबरी मस्जिद कशी पाडता?म्हणजे राऊत साहेब तुम्ही केल कि चमत्कार आणि आम्ही केल कि बलात्कार हि बामणी वृत्ती बदला.इतिहासात कथाबरोबर दंतकथा असतात असे राऊत म्हणतात मुळात इथेच राऊत चूक करतात इतिहास हा कथांचा नसतो तर तो दस्तावेज आणि ऐतिहासिक पुराव्यांचा असतो हे कुणी तरी ह्या नेणत्या पत्रकाराला सांगा.वाघ्याच्या दान्त्काथेने शिवरायांचा कुठे अवमान होतो असा प्रश्नही राऊत पुढे करतात आणि सर्व गोष्टी माहित असून माहित नसण्याच ढोंग करतात मुळात शिवप्रेमींचा विरोध दंतकथेला नसून वाघ्याच्या त्या समाधीला आहे जी मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर जाणीवपूर्वक बसवली आहे.आणि राऊत साहेब आमच्यासाठी शिवराय,भीमराय यांचा अपमान हा कुठल्याही हि गोष्टी हून मोठाच आहे आणि यात जो अडवा येईन त्याला आम्ही शिव आणि भिम्भक्त अडवा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अस्मितेपेक्षा भाकरीची लढाई लढण्याचा सल्ला तुमच्यासारख्या अस्मितेवर मोठे झालेल्या लोकांनी आम्हाला न दिलेलाच बरा.यापूर्वीही तुम्ही दादू कोंडदेव प्रकरणात मराठा बहुजनांच्या अस्मितेशी खेळलात आणि आता हि वाघ्या प्रकरणी मराठ्यांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवत आहात तुमच्या बामणी इतिहासकारांनी आमच्या बहुजन-प्रतिपालक शिवरायांना गो-ब्राम्हण प्रतिपालक बनवले कृपया तुम्ही आता शिवसेनेतील मराठ्यांना वाघ्या-प्रतिपालक बनवून आमच्या मराठ्यांच्या इतिहासावर मुतन्याच पाप करू नका हीच विनंती.जय जिजाऊ....जय शिवराय......
                                                                                    शिवश्री प्रदीप इंगोले

4 comments:

  1. wah sir...
    khup chan blog lihit ahat apan...
    aaple vichar khup avadale mala..!!

    visheshta: tumhi blog var jo prashna takla ahe na - पुरोगामी ब्राम्हण आणि प्रतिगामी ब्राम्हण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत का?
    atishay chan vatle...
    all the best sir.

    jay jijau...!

    ReplyDelete
  2. शिवश्री प्रदीप इंगोले
    तुम्ही हा blog पहा http://jwalant-hindutw.blogspot.in/ आणि सुधारा जरा

    ReplyDelete
  3. Replies
    1. mi dushman nahiye tumcha, swatachya hindu dharmat pinha ya ... Hindu hach khara dharma aahe dada, teva punha swatache shudhikaran karun ya . Yavese watal tar ..

      Delete