Friday 3 August 2012

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक हा एका नवोदित लेखकाचा लेख वाचला त्यात जे प्रश्न लेखकाने जाणून बुजून विचारले त्याचे उत्तर एक शिव
इतिहास अभ्यासक मराठा म्हणून देणे कार्त्याव्या वाटले म्हणून हा लेख प्रपंच. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ४०० कार्यकर्त्यांनी सकाळी ९ ते १० च्या सुमारास शिव सकाळी वाघ्याचा पुतळा फोडला...
आता काही जातीयवादी वृत्तपत्रांनी असा ओरड सुरु केलाय कि धुक्याचा फायदा घेऊन ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा काढला पण त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे कि जर ब्रिगेड ला हे काम अंधारातच करायचे असते तर त्यांनी रात्रीच हे काम केल असत त्यासाठी सकाळच्या धुक्याची कशाला कशाला वाट बघितली असती?असो विषयांतर सोडून मूळ मुद्द्याकडे येऊ.लेखकाने या लेखात जाणून बुजून काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याची उत्तरे माझ्या माहिती नुसार लेखकाला एक समतावादी कार्यकर्ता म्हटल्यावर चांगलीच माहिती पाहिजे.लेखक असे म्हणतात कि प्रश्न पुतळ्याचा नाही तर तो काढण्याच्या पद्धतीचा आहे.म्हणजे याचा अर्थ लेखकाला पण वाघ्या हे काल्पनिक पात्र आहे हे मान्य आहे.मग जर प्रश्न फक्त काढण्याच्या पद्धतीचा असेल तर मग ह्या कृतीने धनगरांच्या अस्मिता कशा दुखावतील?काही स्वंयघोषित इतिहासकारांचे असे मत आहे कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही वादासाठी हे मान्य करूयात कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही पण ती समाधी दुसर्या कुणीतरी शिवरायांच्या जवळील व्यक्तीचीच आहे एवढ तर स्पष्ट आहे कारण वाघ्या कुत्र्याची तर ती समाधी नाही कारण वाघ्या कुत्रा नावाच्या पत्राचाच जन्म १९३६ पूर्वी झाला नवता पण हि समाधी मात्र फार प्राचीन आहे.जेवा राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिव्सामाधीचा शोध घेतला आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला त्यात महात्मा फुलेंनी वाघ्या कुत्र्याचा साधा नाम निर्देश देखील केला नाही याचा अर्थ एवढाच कि वाघ्या त्या काळीही जन्माला नव्हता आणि शिवसमाधी पुढे असलेली ती समाधी कुण्यातरी शिवरायांच्या जवळील व्यक्ती किंवा महाराणी यांची होती मग अश्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्रा बसवणे कितपत योग्य आहे?धनगर समाजाची अस्मिता जर फक्त एक काल्पनिक विदेशी कुत्रा हटविल्याने दुखावली जात असेल तर तो विदेशी कुत्रा ज्या मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर बसवला आहे त्या मराठ्यांच्या अस्मिता किती पटीने दुखावल्या जात असतील या गोष्टीचा विचार धनगर समाजाने केला पाहिजे.एक काल्पनिक विदेशी कुत्रा कुणाच्या अस्मितेचा विषयच कसा होऊ शकतो?लेखकाने लिहिलेली भाषा हि नरके व्हाया सोनवणी व्हाया रामटेके व्हाया लेखक हा दुराचा प्रवास करून येते हे स्पष्ट जाणवते.लेखकांनी ब्रिगेडला विरोध केला ह्याचा मला खेद वाटत नाही आणि लेखकाने आंधळे समर्थन करावे ह्या मताचा देखील मी नाही पण ज्यांच्या सांगण्यावरून लेखकांनी हा विरोध केला त्यांची प्रामाणिकता आणि कार्यशैली लेखकाने आधी जाणून घ्यावी.लेखक म्हणतो कि मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी नाहीत पण मराठा-धनगर वादाचे कारण हे दोघेच आहेत.ज्या जाणकारांनी वाघ्या कुत्रा हा धनगरच्या अस्मितेचा विषय बनवला तो ब्रीगेद्नी आंदोलन हाती घेतल्यावरच का बनवला?जर वाघ्या हा धनगर आणि महादेव जाणकारांची अस्मिता होती तर जाणकार याआधी रायगडावर वाघ्याच्या दर्शनासाठी कितीदा गेले ह्याचा विचार समस्त धनगर समाजानी करावा हा सर्व प्रकार धनगर आणि मराठा यांच्यात वाद पेटवण्यासाठी काही सुपारी खोरणी केला आहे त्यांनी ब्रिगेडच्या बदनामीची सुपारी घेतली आहे हेच यातून सिध्द होते.लेखक लेखात ज्या नरके सोनवणी रामटेके यांना निर्दोष ठरवत आहे त्यांचे विचार लेखकांनी नित समजून घ्यावेत.संजय सोनवणीनि आज वाघ्याच्या निषेधार्थ उपोषण केले आणि असे व्यक्तव्य केले कि ब्रिगेडवर बंदी घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोनावानिनी एकदा जाहीर करावे कि असा कुठला दहशतवाद ब्रिगेडने केला ज्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी ते करतात.आणि जर त्यांना एवढाच जर दहशतवादी कृत्य आणि दहशतवादी संघटनेचा तिरस्कार येत असेल तर पुण्यात काल झालेल्या बॉम्ब स्फोटामागे हिंदुत्ववादी शक्तीचा हात आहे असे पोलिसांनी सांगितलाय मग उद्या संजय सोनवणी ह्या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी आणा म्हणून उपोषणाला बसणार आहेत का?या त्रय्तील रामटेके नावाच्या महाशयाला मी भेटलो आहे हा माणूस समस्त मराठा समाज आणि शिवराय यांचा देखील द्वेष्ट आहे आणि तो शिवरायांनी महाराणा डावलल व शिवराय मनुस्मृतीचे समर्थक होते अशा मताचा आहे.लेखक एक समतावादी कार्यकर्ता आहे याबद्दल मला संशय नाही पण रामटेके सारख्या व्यक्तीचे हे विचार लेखकाला मान्य आहेत का?दुसरा एक प्रश्न लेखक उपस्थित करतात कि शालिनीताई,शशिकांत पवार ह्या मराठा नेत्यांना मराठा म्हणून सौफ्ट कोर्नेर दिला जातो पण नरके सोनवणी ह्यांना का नाही? तर लेखकाला विनोद अनावृत नावाचा एक बुधिस्त लेखक माहित असेल ह्या लेखकाने शिवरायांच्या द्वेषापोटी शिवरायांवर गरळ ओकणारे लेखन केले आहे तरीही तो बहुजन असल्यामुळे ब्रिगेडने त्याला धारेवर धरले नाही तसेच रुप्राज संघावते ह्यांना पण ब्रिगेड ने बहुजन असल्यामुळे झुकते मापाच दिले ब्रिगेडला वाटले असते तर ह्या दोन्घाचा कधीच सुदर्शन झाला असता पण बहुजन असल्यामुळेच ब्रिगेडने त्यांना सौफ्त कोर्नेर दिले एवढे असूनही लेखक असे विधान करतात कि फक्त मराठ्यानच ब्रिगेड बहुजन म्हणून सौफ्त कोर्नेर देते.लेखक लेखाच्या शेवटी लिहितात कि दादू प्रकरणी १८ पगड जातींनी ब्रिगेडला मदत करून दादू हटविला याचा अर्थ १८ पगड जातीच्या लोकांचा दादुला विरोध होता मग नरके नावाच्या प्राण्याचे दादुला समर्थन होते त्याच नाराकेला लेखक निर्दोष कसे ठरवतात.
लेखक फक्त मराठ्यांकादुनच समाजास्याची अपेक्षा कशी करू शकतात जर धनगर समाजाने वाघ्याचा सविस्तर अभ्यास न करता कुण्या न जाणकाराच्या म्हणण्यानुसार वाघ्या कुत्र्याला जर अस्मितेचा विषय बनविला तर या महाराष्ट्रात फार मोठी दंगल घडू शकते आणि सुपारी बहाद्दरान हेच हवे आहे.कुत्र्याला अस्मिता बनवून धनगर समाजाला भादाकावानार्यानी हे पण लक्षात घ्यावे कि अस्मित मराठ्यांना पण असते आणि मराठे शिवरायांच्या बाबतीत बदनामी कधीच सहन करू शकणार नाहीत.आता सत्य तपासून समाजास्या दाखवण्याची गरज आहे जर धनगर समाजाने आक्रमकतेची भाषा केली तर पुढील परिणामांना मराठ्यांना दोष देण्याचा काम कुणी करू नये एवढीच जिजाऊ चरणी प्रार्थना......जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

3 comments:

  1. शिवश्री प्रदीप इंगोलेजी सस्नेह जय जिजाऊ.आपली लेखणी अन्यायाच्या विरोधात तलवारी सारखी चालते ही आजच्या अराजकतेच्या काळात फार फार आनंदाची बाब आहे. परवा "राष्ट्रीय समाज पक्ष" नावाच्या अकौंट धारकाने "तुम्ही बाळ ठाकरे,पुरांदरेला मारा आम्ही धनगर स्वताहून वाघ्याचा पुतळा काढू" असली अडेलतट्टू आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणारी मागणी केली. हरी नरके आणि सोनवणी सर या समाजाला आणि राष्ट्राला कोणत्या दिशेने नेत आहेत याचा प्रत्यय देणाऱ्या या घटना आहेत. त्यांच्या या उठाठेवी आपल्या ब्लॉग वरील वाचकांना वाचता याव्यात यासाठी हा माझा लेख आपल्याला प्रतिक्रिया स्वरूपात देत आहे.

    "तुम्ही बाळ ठाकरे ला मारा, आम्ही वाघ्या काढतो."


    परवा मी फेसबुकवर बसलो असताना "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाने माझ्याशी च्याटीग सुरु केली. सुरुवातीला त्याने मला "नाराज आहात काय ?" असा खवचट प्रश्न विचारला. मी म्हटलं भाऊ नाराज नाही पण वाईट वाटले की आपलेच धनगर बांधव विनाकारण विरोधात गेलेत याचे. तो म्हणाला सुरुवात तुम्ही केली. मी म्हटलं आपल्या अपमानाची प्रतिक आपण झुगारून लावली पाहिजेत. त्याने पुन्हा वाघ्याला पुरावा आहे असे सांगितले. इथं पर्यंत ठीक होतं परंतु त्या "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट माझ्याशी जी काही चर्चा केली टी वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.तो म्हणाला की शिवरायांचा वाघ्या पेक्षा जास्त अपमान ब्राह्मणांनी केला. मी म्ह्टलं होय ठीक आहे. मग त्याने काय म्हणावे? तो म्हणाला की त्यातही जास्त बदनामी पुरंदरे आणि बाळ ठाकरे ( "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाचे उद्गार ) याने केलेली आहे. तर मग तुम्ही लोकानी (म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या ) त्या बाळ ठाकरे आणि बाबा पुरांदरेला मारून टाका मग धनगर समाज स्वताहून कुत्र्याला तिथून काढील. मला धक्काच बसला. की धनगर समाज बांधव नेमके कशाच्या विरोधात आहेत? कुत्र्याच्या , बाळ ठाकरे-पुरांदरेच्या की केवळ मराठ्यांच्या ? एकीकडे वाघ्या काढला आमची अस्मिता दुखावली म्हणून त्यांचे राष्ट्रीय नेते सम्भाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता बाळ ठाकरे - पुरांदरेच्या हत्येची गोष्ट करतो. यातले नेमके काय सत्य धरावे ? तुम्ही त्यांना मारा आम्ही वाघ्याला काढतो असे म्हणणे म्हणजे या लोकांना माहित आहे की त्या वाघ्या कुत्र्याला कसलाच ऐतिहासिक पुरावा नाही. नव्हे हा वाघ्या धनगरांची अस्मिता पण नाही. (अन्यथा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चे काढणाऱ्या पक्षाचे नाव धारण करणाऱ्याने आम्ही स्वतहून वाघ्या काढू असे म्हटलेच नसते.) याचाच अर्थ हा विरोध फक्त मराठा द्वेषातून होतो आहे की काय?


    पुढे मी त्याला समजावले की बाबारे लोकशाहीमध्ये एखदयाला जिवंत मारून टाकणे असले प्रकार शोभून दिसत नाहीत. भारतात बाबासाहेबांची राज्य घटना लागू आहे मनू स्मृती नाही. तो म्हणाला मग तुम्ही लोकांनी वाघ्या का फोडला ? त्याला समजावले की वाघ्या दगडी आहे आणि त्यामुळे शिवरायांची बदनामी होते. मग पुन्हा तो म्हणाला की पुरांदरेने केलेली बदनामी कमी आहे काय? अगोदर त्याचे काय ते बघा नंतर वाघ्याचे बघू. नंतर शिवरायांचा "जय शिवाजी " असा एकेरी उच्चार करून त्याने संवादाला पूर्ण विराम दिला. म्हणजे या लोकांना असे म्हणायचे आहे की ब्राह्मण समाजाने जर महाराजांची बदनामी केली असेल तर मग त्यांच्या कत्तली करा. मगच वाघ्या विषयी बोला? कसली भाषा आहे ही. हरी नरके- संजय सोनवणी या सारखे दिग्गज समतावादी यांच्या पाठीशी असताना यांचे हे असले विचार ? नरके सिरांनी तर संभाजी ब्रिगेड वाल्यांचा आदर्श हिटलर आहे म्हणून त्यांना टार्गेट केले होते. बर संजय सोनवणी सुद्धा त्यांच्या ब्लॉगवरून सारखे तटस्थ राहा असे आवाहन करत असतात. तरीही त्यांचा लिखाणाचा प्रतिवाद करणाऱ्या कुण्या शिवालिक वर्माला एका अद्न्यात व्यक्तीने "समोर ये खांडोळी खांडोळी करतो " अशी धमकी दिल्याचे वर्माच्या प्रतिक्रियेत वाचले. आता याचा अर्थ काय लावायचा?

    ReplyDelete
  2. आता समजा मी रागाच्या भरात एखाद्याला म्हटले की -"मी तुला मारून टाकेल " आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राने लगेच अरेरे तुम्ही हिंसक आहात म्हणून माझी साथ सोडली. तर त्याने या नंतर अहिंसेचा आणि माझ्यापेक्षा योग्य मार्ग अवलम्बायचा की "तूच तर म्हटलं होतास की त्याला मारून टाकेल, मग आत्ता का मारून टाकले नाही ?"असे म्हणायचे ? म्हणजे माझ्या हिंसक भाषेमुळे दुखावून गेलेला माझा मित्र जर तू त्याला का मारले नाही म्हणत असेल तर माझ्या पेक्षा जास्त गरज त्यालाच जाणवते. म्हणून तो चिथावणीखोर भाषा वापरत आहे. मग तो अहिंसक कसा ? पुष्य मित्र शुंगाने हजारो बौद्धांच्या कत्तली केल्या मग बौद्ध बांधवांनी काय तलवारी घेऊन ब्राह्मणांच्या कत्तलीच केल्या काय? तर नाही. ज्या ब्रह्माणी विचारसरणीमुळे बौद्ध कापले गेले ती विचारधाराच समूळ उध्वस्त करायचा प्रयत्न बौद्ध धम्माच्या माध्यमातून चालविला. हाच मुद्दा बाबासाहेबांच्या प्रसंगा वरूनही स्पष्ट होईल. ज्या मनुस्मृती मुळे दलितांना हीन जीवन जगावे लागले ती मनुस्मृतीच बाबासाहेबांनी जाळून टाकली. नाकी तिचे आचरण करणाऱ्या ब्राह्मण समाजाला त्यांनी कत्तलीद्वारे संपवायचा प्रयत्न केला.


    फुलेंनीही लिहून ठेवले आहे की भटांनी तुम्ही लिहिलेली धर्मग्रंथ तुम्हीच जाळून नसत करा, अन्यथा बहुजन समाज जागा झाला तर त्या ग्रंथाच्या होळीत तुम्ह्लाही जाळायला कमी करणार नाही. अर्थात ज्या लोकांनी आमच्यावर अपमानाची प्रतिक लादली ती प्रतिक त्यांच्या विकृत विचारांसाहित नस्त् करावी लागतात. वाघ्याचे शिल्पही शिवरायांना कुत्र्याचा दर्जा देणारे आहे. म्हणून तेही काढायला पाहिजे. याचा अर्थ ज्यांनी ती लादली त्यांच्या कत्तली करणे गरजेचे आहेच असे काही नाही.

    म्हणून धनगर समाज बांधवांनी केवळ विरोधाला विरोध न करता या मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. बामनांनी शिवरायांचा अपमान केला असूनही तुम्ही त्यांना कापत नाही मग तुम्हाला आम्ही वाघ्या काढू देणार नाही. असले आडमुठे धोरण स्वीकारू नये. पण समजत नाही ब्रिगेडवर हिंसकतेचा आरोप करून दूर गेलेले नरके - सोनवणी ही मंडळी आत्ता का गप्प आहे?

    (राष्ट्रीय समाज पक्षाच्या संबंधित च्याटिंगचे स्क्रीन शोट्स माझ्या कडे जपून ठेवलेले आहेत.)

    डॉ.बालाजी जाधव.

    ReplyDelete
    Replies
    1. http://jwalant-hindutw.blogspot.in/

      Delete