Wednesday 27 June 2012

एकेश्वरवादाचा जनक : महात्मा चक्रधर.

भारतातील धर्माची विभागणी ढोबळमानाने तीन प्रकारात केली जाते.
१)निरीश्वरवादी.२)एकेश्वरवादी.३)अनेकेश्वरवादी.
निरीश्वरवादी धर्म म्हणजे जो धर्म कुठल्याच ईश्वराला मानत नाही,एकेश्वरवादी धर्म म्हणजे जो धर्म फक्त एकच परमेश्वर आहे असे मानतो,तर अनेकेश्वरवादी धर्म बर्याच ईश्वरावर श्रद्धा ठेवतो.भारतीय धर्माच्या इतिहासात पहिल्या एकेश्वरवादी धर्माचा मान चक्रधराच्या परधर्माला जातो.भारतीय धर्माचा निपक्षपातीपणे अभ्यास केल्यावर एक गोष्ट समोर येते ती म्हणजे महात्मा चक्रधर हा एकेश्वरवादाचा जनक आहे.कारण चक्रधरापुर्वी निर्माण झालेले जैन धर्म आणि बुद्ध धर्म हे निरीश्वरवादी धर्म आहेत.जैन धर्मात ईश्वराला थारा नाही तर बुद्ध धर्म ईश्वराचे अस्तित्वच मानत नाही.त्यानंतर निर्माण झालेला महात्मा बसवेश्वराचा लिंगायत धर्म हा अनेकेश्वरवादी धर्म आहे.मग इसविसन १२६७ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेला चक्रधराचा परधर्म भारतातील पहिला एकेश्वरवादी धर्म ठरतो.यावरून एकेश्वर्वादाचे जनकत्व महात्मा चक्रधराकडे जाते.
१३ व्या शतकातील हा काळ कर्मकांडरुपी काळ होता.महारःष्ट्रात रामदेवराय यादवची सत्ता होती पण प्रशासकीय सत्ता हेमाद्री पंडित नावाच्या ब्राम्हणाच्या ताब्यात होती.या कालावधीत हेमाद्री पंडिताने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ कर्मकांडअने भरलेला होता.हेमाद्रीने भावनिक बहुजन समाजावर ह्या ग्रंथातील कर्म कांड बिंबवले आणि त्यांना कर्म कांडाच्या नादी लावले.कर्मकांडरुपी चिखलात फसलेल्या बहुजन समाजाची अवस्था "गांड खाजवायला नख नाही आणि हवा जायला भोक नाही" एवढी केविलवाणी झाली.अनेक देवांच्या कर्मकांडात फसलेल्या बहुजनांना एका देवाचा पर्याय देऊन कर्मकांड कमी करण्याचा  युक्तिवाद चक्रधरणे परधर्माच्या तत्वज्ञानातून मांडला.
चक्रधर बहुजनांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणत कि "देव काई अनेक असती?देव तो एकची गा".
करोडो देवांचे थोतांड उघडे करताना चक्रधर म्हणत कि 
"देओ पाखानाचा नव्हे:देओ काष्टाचा नव्हे,
देओ मातीचा नव्हे:देओ चित्रीचा नव्हे,
देओ पट्टीचा नव्हे:देओ धातूचा नव्हे,
 पाखानाचा फुटेल:लाकडाचा मोडेल,
 मातीचा तो विरेल:चित्रीचा तो पुसेल,
पाटीचा तो फाटेल:धातूचा तो झिजेल,
 देओ तो अछेदू:अभेदू:अच्युत:अलेख".
चक्रधर म्हणत देव मातीचा,चित्राचा,पट्टीचा,धातूचा,पाखानाचा आणि लाकडाचा नसतो,मातीचा देव विरेल,चित्राचा पुसेल,पट्टीचा फाटेल,धातूचा झिजेल.मग जर हा देव एवढा अल्पकालीन असेल तर तो देव कसला?देव एकच आहे आणि तो अभेद आहे.
माणसात देव आहे हे सांगण्यासाठी चक्रधर म्हणत "वचनरूप परमेश्वर तो तुम्हा जवळीची असे कि गा".चक्रधराने सांगितलेला एकेश्वरवाद हा कर्मकांड कमी करण्यात पूर्ण यशस्वी झाला होता.जेवढा निरीश्वरवाद जैन सारख्या निरीश्वरवादी धर्माने पाळला नाही त्यापेक्षा जास्त एकेश्वरवाद परधर्माने पाळला.म्हणूनच कि काय चक्रधर आणि त्यांचा परधर्म यापासून प्रेरित होऊन संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी त्यानंतर वारकरी नावाचा दुसरा एकेश्वरवादी धर्म स्थापन केला.नाम्देवावर चक्रधराचा एवढा प्रभाव होता कि नामदेव स्वत परधर्म स्वीकारणार होते पण नामदेव विठ्ठल भक्त होते आणि कट्टर एकेश्वरवादी असलेल्या परधर्मात विठ्ठल भक्ती वर्ज्य होती म्हणून नामदेवाने चक्रधरापासून प्रेरणा घेऊन विठ्ठल भक्त वारकर्यांच एकेश्वरवादी संघटन उभे केले.चक्रधराच्या अनुयायांनी पाळलेला एकेश्वरवाद सिध्द करणारा दुसरा पुरावा म्हणजे चक्रधरांनी सांगितल्यानंतर आज ७५० वर्षानंतर हि चक्रधराचा कुठलाच अनुयायी चक्रधराच्या सांगण्याप्रमाणे एकही वैदिक तसेच शेंदराच्या देवाला पुजत नाही तसेच वैदिक धर्मात केला जाणारे अनेक विधी जसे गणेश पूजन,लक्ष्मी पूजन,तुळशीचे लग्न,किंवा सत्यनारायण चुकुनही घालत नाही.एकेश्वरवाद सांगताना चक्रधराने दिलेला एका देवाचा पर्याय हा अनार्य अवैदिक असलेल्या श्रीकृष्णाचाच दिला हि लक्षणीय बाब आहे आणि हा पर्याय इथल्या मूलनिवासी विचारधारेशी जुळणारच होता.श्रीकृष्णाने त्याकाळी समस्त जातीत विखुरलेल्या बहुजनांना एकत्र करून आर्य असलेल्या इंद्राला जाणारा नैवेद्य म्हणजे या काळातील खंडणी बंद करून मूलनिवासी बहुजनांच्या मुक्ततेचे रणशिंग फुंकले.पुढे श्री कृष्णाने वैदिक कर्मकांड बंद करण्यासाठी आर्य इंद्राशी लढा दिला आणि बहुजनांना वैदिक कर्मकांड बंद करण्याचा सल्ला दिला यातूनच गोवर्धन पर्वत प्रकरण उद्भवले.
अवैदिक कृष्णाचा वैदिक विरोध लक्षात घेऊनच चक्रधराने येथील मूलनिवासी बहुजनासाठी एकेश्वरवादाचा स्वीकार करताना कृष्णाचा पर्याय बहुजनांना दिला.एकेश्वर्वादातील देव निवडताना वैदिक विरोधी देव निवडणाऱ्या चक्रधराचा वैदिकांना आणि त्यांच्या कर्मकांडला किती विरोध असेल हे उघडच आहे परंतु आजकालचे आमचे परधर्मी महानुभाव चक्रधर आणि त्याच्या धर्माला वैदिकाच्याच गोटातील असल्याचे सिध्द करण्यात धन्यता मानत आहेत.१२ व्या शतकात  वैदिक कर्मकांडतून बहुजनांना मुक्त करणाऱ्या चक्रधराला आणि त्याच्या तत्वज्ञानाला आज वैदिक तत्वज्ञानाच्या कचाट्यातून मुक्त करून विज्ञानवादी चक्रधर पुढे आणणे हीच या काळी चक्रधराला श्रद्धांजली ठरेल.....जय जिजाऊ .....जय शिवराय.....जय मूलनिवासी......

                                                                       -शिवश्री प्रदीप इंगोले.
                                                                         जिजापूर(पुणे)९७६६५७५४७९.