Tuesday 22 May 2012

सांगलीकरांच गांधी प्रेम आणि NCERT च कार्टून प्रकरण

महावीर सांगलीकर खरे तर इतके दिवस एक आंबेडकरवादी ,म्हणून लेखन करायचे पण सध्या त्यांना गांधी प्रेमाचा पाझर फुटलाय हे त्याचं लफड उघड होण्यास कारण ठरलं ते NCERT च्या पुस्तकातील बाबासाहेबांच्या बदनामीच नुकताच घडलेलं प्रकरण. सुहास पळशीकर आणि त्याच्या कंपूने जी बाबासाहेबांची बदनामी केली ती जणू कमीच होती म्हणून कि काय महावीर सांगलीकरांनी स्वताला तटस्थ विचारवंत म्हणवून घेण्यासाठी त्या प्रकरणात अस मत नोंदवल कि आंबेडकरवादी गांधीवर अश्लील भाषेत टीका टिप्पणी करतात तेवा त्यांना काही वाटत नाही मग आज बाबासाहेबाची या प्रकरणात जी बदनामी झाली त्याबद्दल कशाला काही वाटून घ्यावयाच? इथे सांगलीकर गांधीला बाबासाहेबांच्या बरोबरीला बसवण्याची खूप मोठी चूक करतात.बाबासाहेब नेहमीच दलितांना म्हणायचे कि गांधी सारख्या कपटी माणसावर विश्वास तुम्ही लोक कसा ठेवता? तसेच रजनीश ओशो म्हणत कि गांधी म्हणजे "the most cunning personality history has ever seen ".महावीर सांगलीकर स्वत एक विचारवंत आहेत आणि इतिहासाच्या संशोधांचा स्वीकार ते नेहमी करतात त्यांनी स्वत सावरकारावर काही संशोधनात्मक लेख लिहून सावरकाराची संघीय चड्डी लोकांसमोर आणली पण गांधीबद्दल जे संशोधनातून सत्य समोर आल तेवा ते स्वताची चड्डी का सावरून घेतात? गांधीवर संशोधन करून लिहिणार्यांना ते कावळ्याची काव काव म्हणतात मंजे त्यांच्या मते सावरकारावर लिहिणारे सर्व पांढरे बगळे आणि तोच न्याय गांधीला लावला तर मात्र गांधीवर लिहिणारे सर्व काळे कावळे?गांधीच महात्म्य सांगण्यासाठी ते नको तो खटाटोप करतात त्यांच्या मते एखादी व्यक्ती किती महान  व लोकप्रिय असते हे मोजण्याचे ४ parometers असतात.१.त्या व्यक्तीवर जगातील किती देशांनी पोस्टाची तिकिटे प्रकाशित केली? २.त्या व्यक्तीवर जगातील किती भाषांमध्ये पुस्तके निघाली? ३.त्या व्यक्तीने मांडलेले जागतिक दर्जाचे लेखक किती प्रमाणात आपल्या पुस्तकात देतात? ४.त्या व्यक्तीवर जगातील किती देशांनी चित्रपट बनवले?ह्या सर्व उच्चभ्रू parometers  मुळे सांगलीकर गांधीला महान ठरवून मोकळे होतात पण ह्याच parometers प्रमाणे एक तरी बहुजन महापुरुष महात्मा ठरतो का? हि सर्व साधने बामानांच्या हातात  आहेत मग ती त्यांचीच कावळे मोठे करणार वरील parometers मध्ये फुले, शाहू,बाबासाहेब,जिजाऊ, शिवराय, अहिल्याबाई,ताराराणी,अण्णाभाऊ,गाडगेबाबा बसतात का महावीरजी? मग आता  ह्या सर्व बहुजन महामानवाना तुम्ही महात्मा मानणार नाही का? भारतातील गांधी घराणे बाहेरील जगाला गांधी म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच गांधी अशी दृष्टी बनवत म्हणून मग ते अजाणतेपणाने गांधीवर पुस्तके,तिकिटे आणि चित्रपटे बनवतात पण अश्याने ती व्यक्ती खूप मोठी असते असे समजण्याइतके  अजाणते तुम्ही तर नाहीत.सामाजिक अंगाने विचार केला तर व्यक्ती किती महान आहे हे मोजण्याचे निकष पुढे आहेत.१.त्या व्यक्तीच्या नावावर देशात किती संघटना,पक्ष कार्यरत आहेत? २.त्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते.३.त्या व्यक्तीच्या कार्याचा उपयोग म्हणून किती राजकीय पक्ष त्या व्यक्तीला निवडणुकीचा मुद्दा बनवतात?महावीरजी ह्या सर्व निकषामध्ये बहुजनांचे सर्व महापुरुष बस्सतात पण बाम्नांचे भंपक कावळे यात बसत नाहीत.गांधीसुद्धा ह्या निकषात बसत नाहीत पण माझे शिव-फुले-शाहू-आंबेडकर यात बसतात.जर सिनेमे आणि टपाल तिकिटावरून जर महात्मे ठरत असतील तर महाविराजी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सगळ्यात मोठे महात्मे ठरले असते.जर गांधीला लोकांनी स्वीकारलं असत तर सर्व पक्षांच्या प्रचारात गांधीचा फोटो असला असता पण अपक्ष उमेदवार सुद्धा गांधीला विचारात नाही कारण गांधी नावाची सर्वात अश्लील शिवी आहे असे सर्व लोक मानतात.गांधीच्या मागे कुणीच नाही फक्त गांधी घरान आहे जे या देशावर राज करते म्हणून बाहेर देशात त्यांनी गांधीच्या राई एवढ्या  कार्याचा पर्वत करून दाखवला.गांधीनी ब्रीतीशाना लिहिलेलं पत्र हरी नार्केनी प्रसिध्द केल आहे त्यात गांधी इंग्रजांना म्हणतात कि जर तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्यात दलितांना अधिकार असतील तर अस स्वातंत्र्य आम्हाला नको आहे म्हणून सर्व बहुजन समाज असा मानतो कि आमच स्वातंत्र्य नाकारणारा असा वांझोटा महात्मा आम्हाला नको.

No comments:

Post a Comment