Tuesday 22 May 2012

महानुभावां​चा परधर्म : हिंदू धर्माशी फारकत!!एक संशोधन.

                    


भारतीय धर्मांचा अभ्यास करताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे प्रत्येक धर्माचा इतिहास जेवढा उघड आहे त्यापेक्षा जास्त गुपित आणि दुर्लक्षित आहे.महानुभाव आणि त्यांचा धर्म पण याला अपवाद नाही.महानुभाव या शब्दाचा अर्थ होतो ज्या व्यक्तीला महान अनुभव आहे असा तो.महानुभाव हा धर्म नसून धर्माच्या प्रसारकांना दिलेली ओळख आहे.जसे वैदिक धर्माचे प्रसारक भट या नावाने ओळखले जातात,जसे बुद्ध धम्माचे प्रसारक भिक्कू या नावाने ओळखले जातात किंवा इस्लाम धर्माचे प्रसारक मुल्ला-मौलवी या नावाने ओळखले जातात तसेच महानुभाव हे "परधर्म" नावाच्या धर्माचे प्रसारक आहेत.परधर्म नावाचा स्वतंत्र धर्म महात्मा चक्रधराने इसवि सन १२६७ मध्ये महाराष्ट्रात स्थापन केला.महावीर जैन,तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर नंतर चौथा धर्म संस्थापक होण्याचा मान महात्मा चक्रधराला जातो.नावावरूनच प्रस्थापित धर्म व्यवस्थेशी घेतलेली फारकत जाणवणारा हा परधर्म आज बहुजनांच्या अज्ञानीपनामुळे वैदिक धर्माचा एक पंथ "महानुभाव पंथ" म्हणून उरला आहे.सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि महानुभाव हा धर्म नाही तर ती धर्मप्रसारकची ओळख आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुजन महानुभावांचा धर्म हा वैदिक(हिंदू) धर्माचा पंथ नाही.जो धारणा करतो तो धर्म अशी धर्माची व्याख्या पुराणात आहे मग जर धारणा करणारा धर्म असेल तर मग वैदिक(हिंदू) धर्म तर बहुजन महानुभावांची कुठलीच धारणा करत नाही मग असा वैदिक(हिंदू) धर्म महानुभावांचा धर्म कसा असू शकेल?धर्माची दुसरी व्याख्या पाश्चिमात्य विचारवंत थिओडोर पार्कर अशी करतो कि धर्म म्हणजे केवळ सिद्धांत नसून जीवनप्रणाली आहे.मग वैदिक(हिंदू) धर्मातील कुठलाच  सिद्धांत बहुजन महानुभावांची जीवनप्रणाली नमूद करत नाही मग असा वैदिक(हिंदू) धर्म महानुभावांचा धर्म कसा असू शकेल?महानुभावांचा वैदिक धर्मापासून वेगळा असा स्वतंत्र परधर्म नावाचा धर्म होता याचा पुरावा चक्रधराच्या सुत्रापाठात आहे.चक्रधर सुत्रापाठात उमाइसा नावच्या शिष्यीनीला धर्माचे महत्व सांगताना म्हणतात कि "परधर्म तुमचे जीवन कि गा".चक्रधर सूत्रपाठात कधीच महानुभाव पंथ म्हणून उल्लेख करत नाहीत.ते नेहमी परधर्म हाच उल्लेख करतात.

महानुभाव हे परधर्माचे प्रसारक होते आणि महानुभावांचा परधर्म हा वैदिक(हिंदू) धर्माहून वेगळा धर्म होता हे सिध्द करणारा ऐतिहासिक पुरावा म्हणजे जिझिया करावीषयी औरंगजेबाने काढलेले फर्मान.औरंगजेबाने त्याच्या राजवटीत जिझिया नावाचा कर लादला होता.हा कर फक्त हिंदू धर्मियांवर लादला गेला होता जे जे हिंदू सोडून इतर धर्मीय होते त्यांना या करापासून मुक्ती दिली गेली होती. औरंगजेबाचे त्या कराचे फर्मान आज हि उपलब्ध आहे त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे कि महानुभावांवर जिझिया कर लादू नये.यावरून हे सिध्द होते कि परधर्मीय महानुभाव हे वैदिक(हिंदू) नव्हते आणि नाहीत त्यांचा एक स्वतंत्र धर्म आहे.
महानुभाव वैदिक(हिंदू) नसल्याचा तिसरा ऐतिहासिक पुरावा म्हणजे महानुभावांच्या पेशावायीत केलेल्या कत्तली.भारतीय इतिहासात हिंदू धर्मापासून वेगळे होऊन जातीयता आणि विषमतेवर प्रहार करणाऱ्या धर्मावर आणि त्यांच्या प्रसारकांवर वैदिक ब्राम्हणांनी प्राणघातक हल्ले केलेले आहेत.बुद्ध धर्म हिंदुधर्मापासून वेगळा होऊन सर्वमान्यता प्राप्त करत होता तेव्हा पुष्यशंग मित्र नावाच्या ब्राम्हणाने एका बौध भिक्कुच्या डोक्यावर एकलक्ष सोन्याच्या मोहरा बक्षीस ठेऊन भिक्कुंच्या कत्तली घडवून आणल्या कारण बुद्ध धर्म हा हिंदू धर्मापासून वेगळा होऊन ब्राम्हणांना आव्हान करत होता.तसेच काम परधर्म प्रसारक महानुभाव वैदिक(हिंदू) धर्मापासून वेगळे होऊन करत होते म्हणून पेशावायीच्या कालखंडात महानुभावांच्या प्रचंड प्रमाणात कत्तली झाल्या.महानुभावांचे साहित्य जाळण्यात आले नानासाहेब पेशव्याने तर महानुभवाना  वाळीत टाकण्याचे फर्मान काढले होते.पेशवे दफ्तर संशोधनानंतर हि बाब उघडकीस आली आणि याचा फर्मान रुपी पुरावा हि सापडला.यावरून हेच सिध्द होते कि जसे बुद्ध वैदिक(हिंदू) धर्मापासून वेगळे होऊन स्वत:च अस्तित्व निर्माण करत होते तसेच अस्तित्व परधर्मीय महानुभाव हिंदुपासून वेगळे होऊन करत होते म्हणूनच भिक्कुप्रमानेच महानुभावांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या.महानुभाव हिंदू धर्मापासून वेगळे असल्याचा आणखी महत्वाचा पुरावा म्हणजे ब्राम्हणरत्न लोक-अमान्य टिळकाची साक्ष.महानुभावांच्या एका बदनामीच्या प्रकरणात टिळकाणे अभ्यासअंती कोर्टात अशी साक्ष दिली होती कि महानुभाव हे वैदिक(हिंदू) नाहीत.म्हणजे महानुभावांचा हिंदुपासून वेगळा झालेला एक स्वतंत्र धर्म आहे हे टिळकाच्या काळापर्यंत सर्वश्रुत होते.महानुभावांचे रिती,रिवाज,उपासना,दैवत हे सर्व वैदिक(हिंदू) पेक्षा वेगळे निर्माण केलेले होत म्हणूनच ब्राम्हण त्यांना अर्ध-बाटगे मुसलमान म्हणून हिणवत असत.

चक्रधराच्या नंतर अनुयायांच्या भोलेपनामुळे ब्राम्हणांनी हा धर्म स्वता:च्या ताब्यात घेतला.परधर्म हे नाव नामशेष करण्यासाठी ब्राम्हणांनी महानुभाव या नावाचा प्रचार आणि प्रसार केला.परधर्म नावामुळे बहुजन जागृत होतील इतिहासाचा अभ्यास करून वैदिक(हिंदू) धर्माच्या पेकाटात लाथा घालून ब्राम्हणांना नामशेष करतील म्हणून ब्राम्हणांनी परधर्मीय ओळख पुसण्यासाठी परधर्मीय बहुजनांचे महानुभाविकरण सुरु केले.पण परधर्मीय असलेल्या बहुजनांचे महानुभाविकरण हे महानुभाविकरण नसून ब्राम्हणीकरणच आहे हे समजण्याची अक्कल सुजाण बहुजानात नाही हि एक शोकांतिका आहे......जय जिजाऊ.....जय शिवराय

                                         -शिवश्री प्रदीप इंगोले
                                          जिजापूर(पुणे)९७६६५७५४७९.

2 comments:

  1. jai jijau !!
    apan mahanubhav ani pardharm yatil fark yogy ritya samjun sangitla ahe.
    aplya bhavi lekhanis shubhecha.

    ReplyDelete